Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा'- "पंचमहाभूते, मानवी शरीर व योगसाधना''

01 Jul 2022

आरोग्यशास्त्रानुसार आपल्या शरीरात पंचमहाभूते संतुलित प्रमाणात असतात. ह्या प्रमाणाचे संतुलन जेंव्हा बिघडते तेंव्हा आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात.
शरीरामध्ये नवीन पेशी तयार होण्यासाठी पृथ्वी तत्व कार्य करत असते. अन्न पचनाचे कार्य अग्नी तत्व करत असते, रक्ताभिसरणाचे काम आप तत्व करत असते, श्वसनक्रियेसाठी वायु तत्व कार्यरत असते, आरोग्यपूर्ण मनोव्यापाराठी आकाश तत्व कार्यरत असते. शरीराचे सर्व कार्य व्यवस्थित चालू राहण्यासाठी पंचमहाभूते महत्वाची असतात. पंचमहाभूते, मानवी शरीर व योगसाधना यासबंधित मार्गदर्शनासाठी...

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, दि. ०१ जुलै २०२२
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०

या सत्रात प्रशिक्षिका सौ. वर्षा देशपांडे (प्रख्यात योग प्रशिक्षिका) (भारतीय योग संस्थान, दिल्ली) यांचे "पंचमहाभूते, मानवी शरीर व योगसाधना'' या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

आपणही ऑनलाईन सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा !
निरामय जीवनशैलीसाठी आपणही अवश्य सहभागी व्हा !

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd

विनीत -
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank