Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

देवगिरी फिटनेस क्लब अंतर्गत योगाभ्यासाचे विशेष प्रशिक्षण - श्री. जितेंद्र परमार

10 Feb 2021

दैनंदिन जीवनातील बदलती जीवनशैली व चुकीच्या पध्दतीने झालेल्या शारीरिक हालचाली या प्रामुख्याने मानदुखी व कंबरदुखी आजारांच्या प्रमाणात वाढ होण्यास कारणीभूत आहेत.
नियमित केलेल्या योग्य व्यायाम पद्धतीतून या आजारातून सुटका होऊ शकते.
म्हणूनच मणक्यांच्या आजाराने त्रस्त असलेल्यांसाठी व भविष्यात हा आजार जडू नये यासाठी `देवगिरी फिटनेस क्लब`अंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या `आरोग्यम् धनसंपदा` या सदरात शुक्रवार, दि. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ६:१५ ते ७:३० या सत्रात प्रसिद्ध योगा ट्रेनर श्री. जितेंद्र परमार (रिसर्च स्कॉलर, डिपार्टमेंट ऑफ योगा, DAVV युनिव्हर्सिटी इंदौर, योगा ट्रेनर, यशवंत क्लब इंदौर) यांचा ‘???????????????????????? ???????????????????? ???????????????????????????????? ???????????????? ???????????????????????????????? ????????????????????????????????????’ यावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षणात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री. किशोर शितोळे (अध्यक्ष, देवगिरी बँक) यांच्या वतीने करण्यात येत आहे.

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

News-Image-of-deogiri-bank