Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Bank, BankLoan, IFSCcode,
Deogiri Bank Blog Image

IFSC Code आणि त्याचे महत्त्व काय...?

07 September 2021

  बँकिंग क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. अत्याधुनिक सुविधांमुळे आता झटपट व्यवहार, आर्थिक देवाण-घेवाण शक्य झाली आहे. इंटरनेट बँकिंगमुळे कुठेही, कधीही पैसे पाठवता येतात आणि मागवताही येतात. देवगिरी बँकेनेही आपल्या कार्यपद्धतीत वेळोवेळी बदल करून ग्राहकांना तत्पर आणि पारदर्शक बँकिंग सुविधा दिली आहे. आर्थिक व्यवहारात होणारे फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी उच्च पातळीवर खबरदारी घेण्यात येते, पण तरीही काही अप्रिय घटना घडतातच. त्यामुळे बँकिंग करताना प्रत्येकाने सजग आणि जागरूक ग्राहक बनण्याची गरज निर्माण झाली आहे. बरेचदा अर्थ किंवा बँकिंग क्षेत्रातील अनेक संकल्पना आपल्यालाही माहीत नसतात, पण त्यांची माहिती मिळवायला हवी. IFSC Code हा प्रकारही त्यातलाच. चेकने व्यवहार करीत असताना किंवा इतरत्र पैसे पाठवत असताना IFSC Code महत्वाचा ठरतो. काय आहे या Code चे महत्व...? आपल्या पासबुक/चेकबुकवर छापलेल्या IFSC चा अर्थ काय आहे...? बँकिंग क्षेत्रात हा Code का महत्वाचा ठरतो...?

  भारतीय वित्तीय प्रणालीत IFSC Code इलेक्ट्रॉनिक मनी ट्रान्सफरसह इतर व्यवहारांसाठी वापरला जातो. IFSC Code हा भारतीय बँकिंग पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा भाग आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जारी केलेला हा 11 अंकी क्रमांक एखादी स्वतंत्र बँक आणि त्या बँकेच्या विविध ठिकाणच्या शाखा ओळखण्यासाठी असतो. IFSC क्रमांकातील पहिली चार अक्षरे बँकेचे नाव दर्शवतात आणि शेवटचे सहा क्रमांक त्या त्या शाखेचे ठिकाण दर्शवतात. यातील पाचवे अक्षर `शून्य` आहे आणि ते सर्व कोडसाठी सारखे असते.

  IFSC Code मुळे निधीचे ऑनलाइन हस्तांतरण सोपे, सुरक्षित आणि सर्वांसाठी सुलभ होते. बँकांमधील निधी हस्तांतरण, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी), रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) आणि इमिजिएट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस) या मोडद्वारे होणारे सर्व आर्थिक व्यवहार करण्यास मदत होते. IFSC Code मुळे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात प्रभावीपणे पैसे हस्तांतरित करता येतात. त्यामुळे ग्राहकांनो, आर्थिक व्यवहार करताना सजग राहा, सतर्क राहा...!