देवगिरी बँकेच्या FD मध्ये करा फायदेशीर गुंतवणूक !
जीवनात पैशाला महत्वपूर्ण स्थान दिले गेले आहे. जीवनातील इतर संकटे काही ना काही मार्ग काढून सुटू शकतात, पण आर्थिक संकट आले की अनेकांची फजिती उडते. अशा कठीण प्रसंगी सर्वाधिक उपयोगी ठरते ती म्हणजे आपण केलेली बचत. आर्थिक बचत हा कुटुंबाचा प्रमुख आधार ठरतो. त्यातही कुटुंबात पुरुषांपेक्षा महिलांचा कल बचतीकडे अधिक असतो. घरातील सगळे खर्च सांभाळून महिला काही ना काही पैसे मागे टाकतात आणि त्यातूनच निर्माण होतो मोठा निधी. हे पैसे आपल्याला संकटात उपयोगी पडतात. अनेकजण आपल्या बचतीमधील रक्कमेचा काही भाग मोठ्या गुंतवणुकीसाठी वापरतात. आर्थिक बचतीचे अनेक मार्ग असले तरी भारतात आजही बहुतांश जण सुरक्षित आणि निश्चित परतावा म्हणून मुदत ठेवीत (Fixed Deposit) गुंतवणूक करतात. बँकेत केलेली सुरक्षित गुंतवणूक म्हणून मुदत ठेव एवढाच याचा फायदा नसून, त्याचे इतरही फायदे आहेत. मराठवाड्यातील अग्रगण्य देवगिरी बँक अशीच एक फायदेशीर मुदत ठेव योजना घेऊन आली आहे. ज्यात ग्राहकांना मिळतो आकर्षक परतावा. भविष्यकाळाची मोठी तरतूद म्हणूनच या ठेव योजनेकडे पाहिले जाते. देवगिरी बँकेची ही ५५५ दिवसांची आकर्षक ठेव योजना ग्राहकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. यात रु. १५ लक्ष किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम एकरकमी ठेव म्हणून ५५५ दिवसांसाठी बँकेकडे ठेवली तर त्यावर सर्वाधिक म्हणजेच ८.१०% व्याज मिळते. आता तुम्हीच सांगा, ही मुदत ठेव आहे की नाही फायदेशीर ! इतर कुठल्याही योजनेपेक्षा देवगिरी बँकेच्या मुदत ठेव योजनेतील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. मुदत ठेव प्रकारात तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर, त्याचे इतरही फायदे तुम्ही जाणून घ्यायला हवेत. बँकेतील मुदत ठेवीवर गुंतवणूकदारांना कर्जाची सुविधा उपलब्ध होते. अनेकदा बँक कर्ज देताना हमी मागते. अशावेळी मुदत ठेव ही हमीच्या स्वरुपात वापरून कर्ज मिळवता येते. बँकामधील कर बचतीच्या मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही आयकर सवलतही मिळवू शकता. आर्थिक क्षेत्रात गुंतवणुकीचे इतरही अनेक मार्ग आहेत, पण त्यात जोखीमही अधिक असते. भरघोस व्याजाचे आमिष दाखवून अनेकदा फसवणूक होण्याचीही शक्यता असते. सध्याचे आर्थिक फसवणुकीचे प्रकार लक्षात घेता, सर्वाधिक सुरक्षित आणि विश्वासाची ठेव म्हणजेच देवगिरी बँकेची मुदत ठेव योजना. तुमची रक्कम गुंतवा फक्त ५५५ दिवसांसाठी आणि त्यावर मिळवा भरघोस व्याज. या मोठ्या रकमेतून तुम्ही तुमची कुठलीही गरज भागवू शकता. तुमच्या कुटुंबाची अधुरी राहिलेली स्वप्ने साकार करू शकता. तर मग आजच देवगिरी बँकेच्या जवळच्या शाखेला भेट देऊन, निर्धास्तपणे गुंतवा तुमची मोठी रक्कम आणि त्यावर मिळवा भरघोस व्याज. देवगिरी बँकेच्या आकर्षक ठेव योजना आणि कर्ज योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील क्रमांकावर कॉल करा - 9022 100 400