गुढीपाडव्याच्या मोठ्या खरेदीसाठी देवगिरी बँक सदैव तुमच्यासोबत !
भारतीय संस्कृतीत सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. हा उत्सव देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. मराठी नववर्षाची सुरुवातही याच दिवसापासून होते. वर्षातील गुढीपाडवा, अक्षय तृतीया यासारखे मोठे सणही सध्या जवळ येऊन ठेपले आहेत. उत्सव जसजसे जवळ येतात, तसतशी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढते. येत्या मंगळवारी, ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा साजरा होत आहे. लहान खरेदीसह पाडव्याचे खरे महत्व ओळखून जीवनातली मोठ्यात मोठी खरेदीही याच मुहूर्तावर केली जाते. सोने-चांदी, अलिशान कार, महागडी बाईक यासह रिअल इस्टेट क्षेत्रात या दिवशी फ्लॅट्स, घरे आणि रो-हाऊसेसची बुकिंग होते. कुठल्याही नवीन कार्याचा शुभारंभ करण्यासाठी गुढीपाडवा निवडला जातो. तुमचा गुढीपाडव्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, तुमच्या मनातील इच्छा साकार करण्यासाठी देवगिरी बँक घेऊन आली आहे, आकर्षक व्याजदर आणि सहज सुलभ परतफेडीच्या विविध कर्ज योजना. तुमच्या पसंतीचे मनमोहक घर घेण्यासाठी गृहकर्ज आणि घरासमोर अलिशान कार असावी असे ज्यांचे स्वप्न आहे, त्यांच्यासाठी वाहन कर्जाचा सर्वोत्तम पर्याय देवगिरी बँक घेऊन आली आहे. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. यानिमित्ताने घराघरांसमोर डौलाने उंचच उंच गुढी उभारून सण साजरा केला जातो. शहरी भागात फ्लॅटमध्ये, फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये सुंदरशी गुढी उभारून परंपरेचे उत्साहात पालन केले जाते. तुम्हीही यंदाचा गुढीपाडवा आपल्या स्वतःच्या प्रशस्त घरात साजरा करू शकता. देवगिरी बॅंकेच्या गृहकर्जाच्या माध्यमातून स्वतःच्या घराच्या खरेदीचे स्वप्न साकार करू शकता, ज्याचा व्याजदर आहे अगदी कमीत कमी म्हणजे फक्त ७%. स्वतःचा सुंदर फ्लॅट, घर, बंगलोज, रोहाऊस खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल, तर देवगिरी बँकेचे गृहकर्ज तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. देवगिरी बँकेचे सहज सुलभ वाहन कर्ज गुढीपाडवा हा सण आदिकालापासूनच साजरा होत असून, यानिमित्ताने घरोघर जाऊन गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. आपले नेहमीचे सहकारी, मित्र आणि कुटुंबियांना गुढीपाडवा, तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. नवीन शानदार कार घेण्याचा तुमचा विचार असेल तर यंदाच्या गुढीपाडव्याला देवगिरी बँकेच्या वाहन कर्जाद्वारे तुमचे हे स्वप्न तुम्हाला साकार करता येईल. देवगिरी बँकेने ग्राहकांच्या गरजांचा विचार करूनच कर्ज योजनांची आखणी केली आहे. देवगिरी बँकेच्या वाहन कर्जाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी कागदपत्रे आणि तात्काळ मंजुरी. देवगिरी बँकेच्या वाहन कर्जाचा दरही सर्वांना परवडण्यासारखा आहे. हे वाहन कर्ज तुम्हाला मिळते फक्त ८.७५% व्याजदराने. मग विचार कसला करता, या गुढीपाडव्याला साकार करा तुमच्या मनातील स्वप्ने. देवगिरी बँकेचे वाहन कर्ज घेऊन, अलिशान कार खरेदी करा किंवा शानदार बाईक. देवगिरी बँकेच्या सर्वच कर्ज योजना ग्राहकांसाठी फायदेशीर आहेत. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर देवगिरी बँक ग्राहकांना कर्जरूपाने आर्थिक आधार उपलब्ध करून देते. देवगिरी बँकेच्या विविध कर्ज योजना आणि ग्राहकाभिमुख सुविधांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या जवळच्या शाखेला भेट द्या ! आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !