Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Disable Right-Click and Shortcuts
Screenshot detected! Content hidden.
These schemes of Deogiri Bank will be more profitable
Deogiri Bank Blog Image

देवगिरी बँकेच्या अर्थसाह्याने साकार करा मनातील स्वप्ने ! यंदाचा दीपोत्सव होऊद्या महाखरेदी उत्सव

07 November 2023

आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! दारात सुंदर रांगोळी, झगमगता आकाशदिवा, लक्ष लक्ष दिव्यांचा प्रकाश, आकाशात फटाक्यांची आतषबाजी असे अपार आनंदाचे क्षण घेऊन येते दिवाळी. दीपावली हा सण जसा आनंदाचा आहे, तसाच तो मोठ्या खरेदीचाही आहे. भरगच्च गर्दीने भरलेल्या बाजाराच्या साक्षीने दिवाळीत मोठी खरेदी केली जाते. सणासुदीच्या दिवसात नवनवीन कपडे, दागिने, महागड्या वस्तू खरेदी केल्या जातात. सण-उत्सवादरम्यान ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी अधिकाधिक आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या जातात. कितीतरी आकर्षक नावांनी हा खरेदीचा उत्सव साजरा होतो. मनातली मोठमोठी स्वप्ने साकार केली जातात. तुमच्या मनातही अशीच काही स्वप्ने नक्की असतील. नवीन सुंदर घरात गृहप्रवेश, महागड्या वस्तूंची खरेदी, नव्या अलिशान कारची खरेदी... आणि बरंच काही. आता दिवाळीच्या मोठ्या खरेदीसाठी तुमच्या मदतीला आली आहे मराठवाड्यातील अर्थ क्षेत्रात अग्रगण्य असलेली देवगिरी बँक. यंदाचा दीपोत्सव देवगिरी बँकेच्या साथीने होईल महाखरेदीचा उत्सव.
देवगिरी बँकेच्या आकर्षक कर्ज योजना
* गृहकर्ज योजना
तुमच्या मनातले घराचे स्वप्न साकार करण्यासाठी देवगिरी बँक घेऊन आली अत्यल्प व्याजदराची अनोखी गृहकर्ज योजना. आणखी किती दिवस किरायाच्या घरात काढायचे, असा विचार मनात येत असेल तर आजच तुमच्या नव्या घराची बुकिंग करा. गृहकर्जासाठी देवगिरी बँक आहे ना. तुम्हाला नवीन घर खरेदी करायची असेल किंवा सध्याच्या घराचे नूतनीकरण करायचे असेल, तर देवगिरी बँकेचे गृहकर्ज सर्वोत्तम आहे. कमीत कमी कागदपत्रे, अल्प व्याजदर, वेगवान मंजुरी हीच या गृहकर्जाची वैशिष्ट्ये आहेत. आता शहरात तुम्ही कुठेही घराची खरेदी करा, कर्जासाठी मात्र देवगिरी बँकच सर्वाधिक फायदेशीर आहे. देवगिरी बँकेच्या गृहकर्जाच्या मासिक हप्ता एक लाख रुपयांसाठी फक्त रु. ७७६ एवढा आहे.
* व्यावसायिक कर्ज योजना
दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण-उत्सव. यानिमित्ताने खरेदी तर भरमसाठ होतेच, पण नवनवीन संकल्पांचा शुभारंभही दिवाळीच्या शुभमुहूर्तावर केला जातो. नवीन व्यवसाय, नवीन उद्योगांची सुरुवात याच मुहूर्तावर होते. तुमच्या मनातही नवीन व्यवसाय सुरु करण्याची किंवा व्यवसाय विस्ताराची योजना असेल, तर देवगिरी बँकेची व्यावसायिक कर्ज योजना सर्वात उत्तम अशी आहे. तुम्ही उद्योजक असाल तर तुमच्या व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देवगिरी बँकेचे व्यावसायिक कर्ज सर्वोत्कृष्ट आहे. जलद प्रक्रिया, सुलभ कागदपत्रे आणि आकर्षक व्याजदर यासारख्या वैशिष्ट्यांसह, देवगिरी बँक देत आहे तुमच्या साहसाला आर्थिक बळ. आजच मनातील इच्छांना मूर्त रूप देऊन, देवगिरी बँकेच्या व्यावसायिक कर्ज योजनेचा लाभ घ्या. उद्योजकांसाठी सर्वात फायदेशीर असलेल्या या कर्जाचा मासिक हप्ता अटी आणि शर्तींच्या अधीन राहून एक लाख रुपयांसाठी केवळ १६८७ रुपये एवढा आहे.
* शैक्षणिक कर्ज योजना
मुलांना खूप शिकवून मोठे करावे, त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवावे, असे अनेक पालकांचे स्वप्न असते, पण अनेकदा आर्थिक उपायांअभावी हे स्वप्न केवळ स्वप्नच बनून राहते. तुमच्या मुलाला किंवा मुलीला शिक्षणात उंच भरारी घ्यायची असेल, तर आता पैशांची चिंता करू नका. देवगिरी बँकेच्या शैक्षणिक कर्ज योजनेद्वारे परदेशी शिक्षणाचे तुमच्या पाल्याचे स्वप्न साकार होऊ शकते. अतिशय वेगवान कामकाज, कमीत कमी कागदपत्रे आणि सुलभ परतफेड अशी वैशिष्ट्ये असलेली ही कर्ज योजना आहे. देवगिरी बँकेचे शैक्षणिक कर्ज घेऊन आता तुमच्या पाल्यालाही उंच भरारी घेऊ द्या. शैक्षणिक कर्ज योजनेचा मासिक हप्ता प्रतिलक्ष रु. १७६६ एवढाच आहे.
* वाहन कर्ज योजना
आपल्या घरासमोरही अलिशान कार असावी, असे अनेक कुटुंबांचे स्वप्न असते. आपल्या मुलासाठी शानदार बाईक घेण्याचा विचारही अनेकदा पालकांच्या मनात येतो. आता यंदाच्या दिवाळीत तुमचे हे सुंदर स्वप्न साकार करण्याची वेळ आली आहे. देवगिरी बॅंकेच्या वाहन कर्ज योजनेतून आता तुम्ही सुंदर कार खरेदी करू शकता. अगदी अल्प व्याजदरावर देवगिरी बँक तुम्हाला अर्थसाह्य करते. वाहन कर्ज योजनेचा मासिक हप्ता अटी आणि शर्तींच्या अधीन राहून एक लाख रुपयांसाठी फक्त रु. २०६४ एवढा आहे.
* वैयक्तिक कर्ज योजना
यंदाच्या दीपावली उत्सवात तुमच्या मनातल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील अशा वैशिष्ट्यपूर्ण कर्ज योजना देवगिरी बँक घेऊन आली आहे. घरातील फर्निचर खरेदी, नवीन वस्तूची खरेदी करण्यासाठी आता देवगिरी बँकेच्या वैयक्तिक कर्ज योजनेचा सुलभ पर्याय तुम्हाला मिळत आहे. देवगिरी बँकेचे वैयक्तिक कर्ज घेऊन अत्यल्प व्याजदर आणि सुलभ मासिक हप्त्यावर आता तुम्हीदेखील मनातल्या इच्छा साकार करू शकता. वैयक्तिक कर्ज योजनेचा मासिक हप्ता एक लाख रुपयांसाठी फक्त रु. १८४७ एवढा आहे.
* सोने तारण कर्ज योजना
कुठल्याही अडचणीच्या काळात किंवा आर्थिक संकटात घरातील सोन्याचे दागदागिने खूप महत्वाचे ठरतात. ऐनवेळी पैसे उभे करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यासाठी देवगिरी बँकेची सोने तारण कर्ज योजना अत्यंत फायदेशीर आहे. या कर्ज योजनेत रु. २ लाखांपर्यंत फक्त ९ टक्के व्याजदर अटी आणि शर्तींच्या अधीन राहून आकारला जातो. अडचणीच्या काळात देवगिरी बँकेची सोने तारण कर्ज योजना अत्यंत उपयोगी आहे.
यंदाच्या दीपावली उत्सवात मनसोक्त खरेदी करून साजरा करा आनंदाचा उत्सव. देवगिरी बँकेच्या अर्थसाह्यातून मनातील सगळी स्वप्ने साकार करा. विविध आकर्षक कर्ज योजनांच्या अधिक माहितीसाठी आजच देवगिरी बँकेच्या जवळील शाखेला भेट देऊन सुरुवात करा मंगलमय दीपोत्सवाची. आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! --------------------

Uno Dos Tres Cuatro Seis
Call Call Now