Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Know all about Deogiri Nagari Sahkari Bank
Deogiri Bank Blog Image

मराठवाड्यातील अग्रगण्य देवगिरी नागरी सहकारी बँक

27 January 2021

मराठवाडा भाग मागासलेला असला तरी, हा कष्टकऱ्यांचा प्रदेश आहे. येथील शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून कृषी क्षेत्रात उत्पादनाचे नवे उच्चांक गाठले जात आहेत. कामगारांच्या मनगटात असलेले बळ जाणून या भागातील औद्योगिक क्षेत्रात नवनवीन उद्योग-व्यवसायांची पायाभरणी झाली आहे. उद्योजकांचे गगनभरारी घेण्याचे स्वप्न विविध लघु उद्योगांच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. या सर्वच बाबी आज महत्वपूर्ण ठरतात. मराठवाड्याचे आज दिसणारे चित्र साकारण्यासाठी साधारण चार दशकांपूर्वी समाजातीलच काही संवेदनशील माणसं झटत होती. कष्ट घेत होती. त्या व्यक्तिमत्वांकडे होती एक दूरदृष्टी आजचा विकसित मराठवाडा घडविण्याची. दुर्लक्षित समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यात अशा या महनीय व्यक्तींचा सिंहाचा वाटा आहे.
दिनांक २३ जानेवारी १९८४ रोजी देवगिरी बँकेची स्थापना झाली. देवगिरी बँकेची स्थापना स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून झाली. श्री. हरिभाऊ बागडे, कै. श्री. जयंतराव चौधरी (धामणगावकर) यांच्या गतिशील नेतृत्वात ही बँक अस्तित्त्वात आली. कै. श्री. चंदूमल चोटलानी, कै. डॉ. वी. जी. घारपुरे, श्री. सुखदेव नवले, श्रीमती कुमुद रांगणेकर, श्री. एस. जी. गोखले, डॉ. एम. यू. देशपांडे, श्री. जी. आर. रेगे यांनी बँकेच्या स्थापनेत सक्रिय सहभाग घेतला.

बँकेची पहिली शाखा २३ जानेवारी १९८५ रोजी उघडली गेली. सध्या औरंगाबाद, जालना, अहमदनगर, परभणी, जळगाव जिल्हा, पुणे आणि मुंबई येथे बँकेचे कार्यक्षेत्र आहे. रिझर्व्ह बँकेने आमच्यासाठी परिचालन क्षेत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्र खुला केला आहे. आजघडीला विविध जिल्ह्यांमध्ये बँकेच्या ३१ शाखा यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. ग्राहकांच्या अडचणी ओळखून आपली कार्यशैली आखणाऱ्या देवगिरी बँकेने आजवर पारदर्शक व्यवहारातून विश्वसनीयता जपली. संपूर्ण मराठवाड्यासह खान्देश आणि महाराष्ट्राच्या पटावर देवगिरी बँकेची घोडदौड सुरु आहे. देवगिरी बँकेचे स्वतःचे कला प्रशिक्षण केंद्र आहे. एक आधुनिक डेटा सेंटर आणि मुख्य कार्यालय यांच्या माध्यमातून बँकेचा कारभार सुरळीत सुरु आहे. बँकेची सर्व कार्यालये वातानुकूलित, सुसज्ज, पूर्णपणे संगणकीकृत आणि परस्परांशी जोडलेली आहेत. आपल्या कामकाजात कोअर बँकिंग पॅटर्नचा वापर करणारी देवगिरी बँक ही मराठवाड्यातील पहिली बँक आहे. ग्राहकांची मानसिकता, त्यांच्या गरजा, अडचणी ओळखून बँकेने विविध सुलभ कर्ज योजना आखल्या आहेत. ग्राहकांना आर्थिक सुरक्षितता पुरविण्यासाठी बँकेने अनेक ठेव योजना उपलब्ध केल्या आहेत. देवगिरी बँकेने लॉकर सुविधाही पुरविली आहे. आपल्या ग्राहकांना आर्थिक व्यवहार करणे सोयीचे व्हावे, त्यांना चोवीस तास बँकिंग सेवा पुरविता यावी, यासाठी शहरभर एटीएम बसविण्याची प्रक्रियाही सध्या प्रगतिपथावर आहे. आपले नेटवर्क विस्तारित करण्यासाठी बँक, राज्य आणि राष्ट्रीय खेळाडूंशी करार करण्याची योजना आखत आहे. देवगिरी बँकेने पेड-अप कॅपिटल रुपये २६.६३ कोटी वाढविले आहे. बँकेचा ३१ मार्च २०२० पर्यंत राखीव निधी आणि इतर निधी २०७.७७ कोटी आहे. बँकेकडे १११९.१९ कोटींच्या ठेवी आणि ६४५.७९ कोटीची प्रगती आहे. देवगिरी बँकेचा एकूण व्यवसाय १७६४.९८ कोटी इतका आहे.