
शुभमुहूर्त आला गुढीपाडव्याचा कुटुंबासाठी मोठ्या खरेदीचा !
हिंदू नववर्षाचा प्रारंभ ज्या दिवसापासून होतो तो शुभमुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा. भारतीय संस्कृतीमधील साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त. हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचेही प्रतीक आहे. गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या उत्सव परंपरेतील महत्त्वाचा सण. संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या आनंद व उत्साहात साजरा केला जातो. दारात सुंदर रांगोळी, घराच्या दर्शनी भागात सुंदरशी गुढी उभारली जाते. घरासमोर उभारलेली गुढी विजयाचे प्रतीक मानली जाते. यानिमित्ताने घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारातही मोठी आर्थिक उलाढाल होते. त्याचे कारण म्हणजे, या दिवशी केलेली खरेदी, मग ती सोनेचांदीची असो, घराची असो, किंवा नव्या शानदार कारची खरेदी असो, शुभ मानली जाते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने घराची, फ्लॅटची बुकिंग मोठ्या प्रमाणात होते. रिअल इस्टेट बाजारात मोठी चहलपहल पाहायला मिळते. वाहन बाजारातही अलिशान कार, महागड्या बाईक्सची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झालेली असते. आता याच शुभमुहूर्तावर तुमच्या मनातले गृहखरेदीचे, वाहन खरेदीचे स्वप्न साकार करण्यासाठी देवगिरी बँक घेऊन आली आहे एक मोठी संधी... सर्वात कमी व्याजदर असलेली गृहकर्ज योजना आणि अगदी सुलभरीत्या परतफेड करता येईल अशी वाहन कर्ज योजना.
घरभाडे कशाला, आता भरा गृहकर्ज हप्तागुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर देवगिरी बँक घेऊन आली आहे तुमच्यासाठी गृहखरेदीचा सोपा मार्ग. तुम्ही फक्त तुमच्या पसंतीचे घर किंवा फ्लॅट निवडायचा आणि देवगिरी बँकेच्या आकर्षक गृहकर्जासाठी अर्ज करायचा. सर्वात कमी फक्त ७ टक्के व्याजदराने देवगिरी बँकेचे कर्ज येईल तुमच्या हातात आणि नव्या घरात तुमचा गृहप्रवेश साजरा होईल धुमधडाक्यात. देवगिरी बँकेच्या गृहकर्जाची वैशिष्ट्ये म्हणजे अगदी कमीत कमी कागदपत्रे आणि तात्काळ मंजुरी. घराचे बांधकाम, नूतनीकरण करण्यासाठीही हे गृहकर्ज सर्वोत्तम आहे. तर मग आजच देवगिरी बँकेच्या जवळच्या शाखेला भेट देऊन गृहकर्जविषयी माहिती मिळवा आणि एक पाऊल उचला तुमच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या छानशा घरात शिफ्ट होण्याची हीच तर मोठी सुवर्णसंधी आहे. नवीन सुरुवात करण्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी फ्लॅट बुकिंग किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीने घर किंवा फ्लॅटची खरेदी नक्कीच फायदेशीर ठरू शकते. घराच्या खरेदीसाठी तुम्हाला फक्त कुटुंबासोबत एकविचाराने आर्थिक नियोजन करावे लागेल. तर मग उशीर कशाला करता, घरभाड्याऐवजी आता गृहकर्जाच्या मासिक हप्ता भरा आणि स्वतःच्या सुंदर घरात प्रवेश करा. नव्या घराच्या खरेदीने नवजीवनाचा शुभारंभ करण्याची हीच तर खरी वेळ आली आहे.
वाहन खरेदीने साजरा करा गुढीपाडवालाडक्या मुलीसाठी मोपेड किंवा मुलाला शानदार बाईक घेऊन द्यायचा विचार तुमच्या मनात असेल तर तो पूर्ण करण्यासाठी शुभमुहूर्त आला आहे गुढीपाडव्याचा. होय, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुमच्यासाठी वाहन खरेदीचा मोठा शुभयोग आला आहे. तुमचे हे स्वप्न साकारण्यासाठी मराठवाड्यातील आपली सर्वांची देवगिरी बँक घेऊन आली आहे आकर्षक वाहन कर्ज योजना. या कर्जाद्वारे तुमचे वाहन खरेदीचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. तुम्ही कुटुंबासाठी नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर येत्या गुढीपाडव्याला तो पूर्ण होऊ शकतो. देवगिरी बँक वाहन कर्जाद्वारे तुम्ही हे स्वप्न साकार करू शकता. देवगिरी बँकेने नेहमीच ग्राहकांच्या गरजा व अपेक्षा ओळखून कर्ज योजनांची आखणी केली आहे. देवगिरी बँकेच्या वाहन कर्जाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी कागदपत्रे आणि तात्काळ मंजुरी. वाहन कर्जाचा दरही सर्वांना परवडण्यासारखा. प्रत्येकी एक लाख रुपयांच्या कर्ज रकमेसाठी मासिक हप्ता असेल फक्त २०६४ रुपये ! तर मनाचा निर्धार करून येत्या गुढीपाडव्याला साकार करा तुमचे मोठ्या खरेदीचे स्वप्न. देवगिरी बँकेच्या विविध कर्ज योजना जाणून घेण्यासाठी आजच जवळच्या शाखेला भेट द्या ! कर्ज योजनांच्या अधिक माहितीसाठी कॉल करा : 9022100400