
रोजच्या घरखर्चातून केलेली बचत भविष्यात ठरते फायदेशीर !
थेंबे थेंबे तळे साचे अशी मराठीत एक म्हण आहे. थेंब थेंब पाण्यातून जशी एखादी घागर भरू शकते, त्याचप्रमाणे दररोज केलेल्या थोड्या थोड्या बचतीतून आपण आपली संपत्ती वाढवू शकतो. आज केलेली पैशांची बचत भविष्यातील आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी खूपच उपयोगाची ठरते. त्यामुळे दररोजच्या खर्चातून प्रत्येकाने काही ना काही पैसे वाचवायला हवेत. घरात वडीलधारी मंडळी याबद्दल सल्ला देत असतात. लहानपणापासून मुलांना बचतीची सवय लावण्यामागेदेखील हाच हेतू असतो. नोकरी असो की व्यवसाय, बचतीची सवय प्रत्येकाने अंगिकारायला हवी. सामान्यतः घराचे बजेट सांभाळणाऱ्या महिलांना बचत करण्याची सवय अंगभूतच असते. दररोजच्या घरखर्चातून काही पैसे वाचवून ठेवण्यात महिला पुढाकार घेतात. हे पैसे साठविण्यासाठी बँकेत रिकरिंग डिपॉझिट खाते (RD) उघडले जाते. अतिशय आकर्षक व्याजदरामुळे अनेक महिलांनी RD करण्यासाठी देवगिरी बँकेला प्राधान्य दिले आहे. दर महिन्याला घरखर्चातून शिल्लक राहिलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवली तर त्याचा भविष्यात मोठा फायदा होतो. दररोजच्या खर्चातून अनेक उपायांनी बचत करता येते.
तुम्हीदेखील मनात ठाम निर्धार केला तर बचत करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम, दर महिन्याला घर चालवण्यासाठी किती पैसे लागतात याचा हिशोब करा. आजच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईच्या काळात जर तुम्ही पैशाचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत अडचणीचा सामना करावा लागू शकतो. तुमचा अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी तुम्ही अनेक पद्धतींचा अवलंब करू शकता. यासोबतच जर तुम्ही छोटी बचत केली तर तीदेखील खूप उपयुक्त ठरू शकते. तुम्ही दररोज जी काही खरेदी करता, त्यातूनही पैसे वाचवता येतील. ज्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत, त्याच खरेदी कराव्यात. दररोज सामान न आणता, एकदाच ते घरी आणून ठेवले तर त्यातूनही पैशांची बचत होते. घराच्या प्रगतीत सर्वांचाच महत्वाचा वाटा असतो. त्यामुळे सर्वानी एकत्र येऊन गुंतवणूक योजना बनवली पाहिजे. जितक्या लवकर तुम्ही गुंतवणुकीचे नियोजन कराल तितके अधिक फायदे तुम्हाला मिळतील. बचत योजना बनवताना एक निश्चित उत्पन्न असणे आवश्यक आहे. आजच्या काळात अनेक प्रकारच्या गुंतवणूक योजना उपलब्ध असून, देवगिरी बँकेच्याही अनेक आकर्षक ठेव योजना आहेत. प्रत्येकाने नेहमीच भविष्याचा विचार केला पाहिजे. भविष्यात काही आर्थिक संकट आल्यास आपल्याकडे पैशांची पुरेशी तरतूद आहे का, याचा विचार केला पाहिजे. आयुष्यात पुढे अनेक जबाबदाऱ्या तुम्हाला पेलाव्या लागतील, त्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत असणे खूप गरजेचे आहे. विशेषतः गृहिणीची भूमिका निभावणाऱ्या महिलांनी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
पुढील काही उपायांतूनही तुम्ही पैशांची मोठी बचत करू शकता. * खाण्यापिण्यावर बाहेर हॉटेलमध्ये खर्च न करता, घरी तयार केलेल्या स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थांचा आस्वाद घ्या. * ब्रेकफास्ट, डीनर यावर हॉटेल, रेस्टॉरंट्समध्ये होणार खर्च टाळता येऊ शकतो. * किराणा सामानाची व्यवस्थित यादी करून घ्या. ठोक विक्रेत्यांकडून एकदाच सामानाची खरेदी करा. * विनाकारण शॉपिंग, खरेदी करू नका. * महागड्या भाज्या, फळे खरेदी करण्यापेक्षा त्या त्या सिझनमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या फळे, भाज्यांची खरेदी करा. * लक्षात घ्या, मोसमी भाज्या आणि फळे कमी दरात खरेदी करता येतात. * छोटी छोटी खरेदी न करता, एकत्रित खरेदी करा. * किराणा सामानात अन्नधान्य, तेल, साखर, तांदूळ यांची खरेदी हंगामात केली तर मोठी बचत होते. * अन्नधान्याचा अपव्यय टाळा. अन्न वाया जाऊ देऊ नका. * घरखर्चात विविध प्रकाचे रिचार्ज आणि बिलांचा सुद्धा समावेश होतो. त्यामुळे येथेही बचत गरजेची आहे. * घराचे वीज बिल कमी करण्यासाठी घरात एलईडी बल्बचा वापर करावा. * घरातील वीज उपकरणे वेळोवेळी बंद करावीत. * घरातील इंटरनेट आणि केबल टीव्हीचा योग्य वापर करा. * जीवनातील अनावश्यक खर्च टाळूनही मोठी बचत शक्य आहे. * मनोरंजन, कपडे, गॅजेट्स यावर होणारा अनावश्यक टाळा.तुमच्या घरातील एकूण सदस्यांचे मासिक वेतन, व्यवसायातून मिळणारा पैसा व कुटुंबाचा एकूण अंदाजित खर्च बघून प्रत्येक महिन्याला घरखर्चाचे बजेट तयार केल्यास बचतीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळू शकते. कोणत्या बाबीवर किती खर्च करायचा, हे तत्व प्रत्येक महिन्याला पाळले गेले तर निश्चितच दर महिन्याला आर्थिक बचत करणे शक्य आहे. वर्षभरानंतर किंवा प्रत्येक सहा महिन्यांनी हे बचत केलेले पैसे बँकांच्या गुंतवणुक योजनांमध्ये गुंतवल्यास मोठा फायदा मिळू शकतो. देवगिरी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक व्याजदर असलेल्या मुदत ठेव तसेच आवर्ती ठेवींचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. आजच देवगिरी बँकेच्या जवळच्या शाखेला भेट देऊन विविध ठेव योजनांची माहिती घ्या आणि बचतीचा संकल्प साकार करा.