Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा'-'''पाठदुखीसाठी योगासने व व्यायाम - सत्र दुसरे''

12 May 2022

मानवी शरीराचा महत्वाचा आधार म्हणजे पाठीचा कणा. परंतु आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हा आधार कमकुवत होत चाललाय. ज्यामुळे सर्वसामान्यांमध्ये पाठदुखीसारखा आजार वाढत आहे. पाठदुखीसाठी 'योगासने व व्यायाम' हा उत्तम उपाय प्रचलित आहे. नियमित योग केल्यामुळे मणक्याचे स्नायू अधिक लवचिक आणि बळकट होतात. यात पाठीच्या दुखण्यामुळे होणाऱ्या समस्या टाळता येतात. याविषयी मार्गदर्शनासाठी...

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या
'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, दि. १३ मे २०२२
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३० या सत्रात

प्रशिक्षिका - प्राजक्ता सराफ (महिला समन्वयक, भारत विकास परिषद)

यांचे ''पाठदुखीसाठी योगासने व व्यायाम - सत्र दुसरे'' या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

आपणही अवश्य सहभागी होऊन लाभ घ्यावा !

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd

विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank