Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

`आरोग्यम धनसंपदा` - 'योगशिक्षण - आवश्यकता व महत्व`

29 Jul 2021

शारीरिक आणि विशेषतः मानसिक आरोग्य स्थिर राहण्यासाठी, एकटेपणा, ताणतणाव, राग तसेच निराशाजनक भावना यातून बाहेर येण्यासाठी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम होण्याची आवश्यकता आहे. यावर अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे प्राणायाम, योगासने आणि ध्यानधारणा.
काही लोकांचा गैरसमज असतो की हे सर्व फक्त प्रौढ किंवा वयस्कर लोकांसाठी असते. वस्तुस्थिती अशी आहे की, सर्व वयोगटातल्या लोकांना प्राणायाम, ध्यान यांचा खूप फायदा होतो.

देवगिरी बँकेतर्फे दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' या सदरात
शुक्रवार, दि. ३० जुलै २०२१
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०
या सत्रात प्रशिक्षक प्रमिला आव्हाळे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे योगा कोच म्हणून कार्यरत, पतंजली युवती प्रभारी म्हणून कार्यरत) यांचे 'योगशिक्षण - आवश्यकता व महत्व` या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/

विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank