Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Disable Right-Click and Shortcuts
Screenshot detected! Content hidden.

'आरोग्यम् धनसंपदा' -`योग संजीवन` (भाग-1)

06 May 2021

वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन, तसेच उत्तम आरोग्य या सर्व गोष्टी योगसाधनेमुळे प्राप्त होतात.
नुसते शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही, तर त्याबरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिले पाहिजे. फक्त रोगविरहित शरीर असण्याला स्वास्थ्य म्हणता येणार नाही. त्यासोबतच आनंद, प्रेम आणि उत्साह हे तुमच्या जीवनात उत्स्फूर्तपणे व्यक्त होत असले पाहिजे, तरच त्यास खरी आरोग्य संपन्नता म्हणता येईल.
यासाठी देवगिरी बँक दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या
'आरोग्यम् धनसंपदा'च्या
दि.०७/०५/२०२१,
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०
या शुक्रवारच्या सत्रात `योग संजीवन` अभ्यासक्रमातील पहिल्या सत्रात
प्रशिक्षक शरद पारगावकर (*योगाचार्य या पदवीने सन्मानित, *योगविद्या गुरुकुल नाशिक संस्थेचे कार्यवाह) मार्गदर्शन करणार आहेत.
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank
Uno Dos Tres Cuatro Seis
Call Call Now