Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

`आरोग्यम धनसंपदा` या सदरातील शुक्रवारच्या सत्रात प्रसिद्ध योग प्रशिक्षक जयमंगल जाधव 'रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी योग (भाग-२)' यावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.

29 Apr 2021

सध्याच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. योगसाधना केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर आपले मन शांत आणि एकाग्र होते. त्याचा फायदा आपणास दैनंदिन व्यवहारात होतो. योगसाधनेमुळे फुप्फुसांची क्षमता सुधारते. शरीराला अधिकाधिक ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे शरीर सुदृढ होते. आत्मविश्वासात वृद्धी होते.
नियमित योगासने केल्यास अनेक आजार दूर होण्यास मदत होते. यासाठी `देवगिरी फिटनेस क्लब`अंतर्गत होणाऱ्या `आरोग्यम धनसंपदा` या सदरातील शुक्रवारच्या सत्रात प्रसिद्ध योग प्रशिक्षक जयमंगल जाधव (योगतज्ञ, आर्ट ऑफ लिव्हिंग) यांचा शुक्रवार, दि. ३०/०४/२०२१, वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३० या वेळेत 'रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी योग (भाग-२)' यावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.
आपणही यामध्ये अवश्य सहभागी होऊन योगसाधनेचे महत्व जाणून सुदृढ राहण्याचा प्रयत्न करावा.
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank