`देवगिरी फिटनेस क्लब`अंतर्गत होणाऱ्या `आरोग्यम धनसंपदा` या सदरातील शुक्रवारच्या सत्रात प्रसिद्ध योग प्रशिक्षक जयमंगल जाधव
सध्याच्या कोरोना महामारीत रोगप्रतिकारक क्षमता वाढवून ऑक्सिजनमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत, हे एव्हाना सर्वांनाच कळून चुकले असेल. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विविध पौष्टिक आहारासोबतच योगासनेदेखील तुम्हाला मोलाची मदत करू शकतात.
योगासनांचा नियमित अभ्यास खूपच लाभदायक होऊ शकतो. यासाठी `देवगिरी फिटनेस क्लब`अंतर्गत होणाऱ्या `आरोग्यम धनसंपदा` या सदरातील शुक्रवारच्या सत्रात प्रसिद्ध योग प्रशिक्षक जयमंगल जाधव (योगतज्ञ, आर्ट ऑफ लिव्हिंग) यांचा शुक्रवार, दि. २३/०४/२०२१,
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३० या वेळेत 'आनंदी जीवनासाठी योग' यावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.
आपणही यामध्ये अवश्य सहभागी होऊन निरामय जीवनाचा आनंद घ्यावा !
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)
