Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा' - "योगाभ्यासाचे दैनंदिन जीवनातील महत्व"

22 Sep 2022

आपल्या धावपळीच्या आयुष्यात सकाळी उठल्यापासून धावपळ सुरू असते. दररोज वेगवेगळ्या ताण तणावांना सामोरे जावे लागते. कुटुंबातील आर्थिक अडचणी आणि आरोग्याच्या कुरबुरी, कामाचा ताण यामुळे तणाव वाढू लागतो. हा तणाव आरोग्यास हानिकारक असतो. या तणावापासून मुक्त होण्यासाठी आणि निरामय जीवन जगण्यासाठी रोज योगा करणे अतिशय उपयुक्त ठरते. याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी....

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, दि.२३ सप्टेंबर २०२२
वेळ: सकाळी ६:१५ ते ७:३०

या सत्रात प्रशिक्षक - श्री. वैजनाथ डोमाळे (प्रख्यात योग प्रशिक्षक) भारतीय योग संस्थान, दिल्ली यांचे "योगाभ्यासाचे दैनंदिन जीवनातील महत्व" या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

निरामय जीवनशैलीसाठी आपणही ऑनलाईन सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा !

विनीत - किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/

News-Image-of-deogiri-bank