Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Turn Your Dream Into Reality With Deogiri Bank
Deogiri Bank Blog Image

अक्षय तृतीयेला साकार करा तुमची स्वप्ने, देवगिरी बँकेच्या अर्थसाह्याने...!

28 April 2022

  अक्षय म्हणजे ज्याचा कधीच क्षय होत नाही अर्थात जे कधीच संपत नाही...! आणि म्हणूनच अक्षय तृतीया या तिथीला भारतीय सण-उत्सवांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी केलेले कुठलेही कार्य आपल्याला जीवनात कधीही न संपणारे शुभफल देते. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर केलेल्या खरेदीमुळे समृध्दी मिळते. नवीन घर खरेदी, घर बांधकामाचे भूमिपूजन, पायाभरणी, नवीन व्यवसायाचा शुभारंभ या दिवशी अगत्याने करतात. अहो, मग तुमचीही काही स्वप्ने असतीलच की...!

  मला सांगा, रेंट देऊन आणखी किती दिवस राहायचं... जागांच्या, फ्लॅट्सच्या घरांच्या किमती वरचेवर वाढत आहेत... जवळपास निम्मी सॅलरी नुसती रेंट देण्यात जातेय... हे असं आणखी किती दिवस चालायचं...? हे सगळेच प्रश्न जेव्हा आपली झोप उडवतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण जागे होतो. धडपड करतो. या शहरात माझंही स्वतःचं घर असावं, असं स्वप्न पाहणाऱ्या सर्वांसाठीच काही बाबी मात्र महत्वाच्या ठरतात. सर्वात महत्वाचा प्रश्न असतो... पैशांच्या उभारणीचा...! जीवनात आपली अनेक स्वप्ने असतात, ती पूर्ण करण्याची जिद्दही आपल्यात असते, पण काही अडचणी येतात आणि आपण थांबून जातो. पण आता आर्थिक साहाय्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातही बँक हे संपूर्णतः विश्वासार्ह माध्यम असल्याने बँकेच्या अर्थसाह्यातून आपण आपली स्वप्ने साकार करू शकतो. अगदी अल्प व्याजदरावर बँकेतून कर्ज मिळते. मराठवाड्यात जनसामान्यांचा विश्वास जिंकून प्रगतीच्या दिशेने झेप घेणारी देवगिरी नागरी सहकारी बँक अर्थसाह्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. ग्राहकांचा अक्षय तृतीयेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बँकेने विविध आकर्षक कर्ज योजना सादर केल्या आहेत. देवगिरी बँकेच्या सहकार्याने यंदाच्या अक्षय तृतीयेला तुमची स्वप्नेही नक्कीच साकार होतील. वेगवान कामकाज, विश्वासार्हता आणि पारदर्शकता जपून सेवेसाठी तत्पर असलेला कर्मचारीवर्ग, अल्प व्याजदराच्या कर्ज योजना आणि त्वरित कर्जमंजुरी यामुळे देवगिरी बँकेने मराठवाड्यातील जनमानसात प्रतिष्ठेचे स्थान मिळविले आहे. देवगिरी बँकेने ग्राहकांच्या अडचणी ओळखून कर्ज योजनांसाठी सहजसुलभ परतफेडीचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तत्पर सेवा मिळत असल्याने बँकेच्या ग्राहकसंख्येतही मोठी वाढ होताना दिसते.

  देवगिरी बँकेची गृहकर्ज योजना ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. उद्योगविश्वात औद्योगिक संस्थांना त्वरित कर्जपुरवठा होत असल्याने त्यांचा विस्ताराचा आणि प्रगतीचा मार्ग देवगिरी बँकेने अधिक सुकर केला आहे. भारतात किंवा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जाते. त्यामुळे पैशांअभावी राहिलेले त्यांचे शिक्षण पूर्ण होऊन पालकांचेही स्वप्न साकार होते. सण-उत्सवांच्या शुभमुहूर्तावर आलिशान कार घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अशांसाठी बँकेने वाहन कर्ज योजना आणली आहे. अतिशय सुलभ परतफेडीचे अनेक पर्याय देवगिरी बँक उपलब्ध करून देते. रोजच्या जीवनात अचानक येणाऱ्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी देवगिरी बँकेची वैयक्तिक कर्ज योजना खऱ्या अर्थाने साह्यभूत ठरते.

  २३ जानेवारी १९८४ रोजी स्थापन झालेल्या देवगिरी बँकेच्या एकूण ३१ शाखा आहेत. तसेच कर्मचारी प्रशिक्षण केंद्र, आधुनिक डेटा सेंटर, कॉल सेंटर, कर्ज विभाग आणि मुख्य कार्यालय आहे. बँकेने मराठवाड्यातील जनमानसावर अधिराज्य निर्माण केले आहे. मराठवाड्यातील अग्रणी बँक अशी ओळख असलेली देवगिरी बँक ग्राहक सेवेत आघाडीवर आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना अनेक ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पारदर्शक व्यवहार आणि विश्वसनीयतेच्या बळावर बँक आजघडीला प्रगतिपथावर आहे.

  देवगिरी बँक ग्राहकांच्या मागणीचा वेळोवेळी पाठपुरावा घेते. ग्राहकाची कुठलीही गैरसोय न होऊ देता, कामकाजाचा तात्काळ निपटारा हेच ध्येय बाळगून अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. ग्राहकांच्या साह्यासाठी बँकेची `बीआरओ (BRO) टीम` सज्ज असते. कर्ज प्रकरण, खाते उघडणे, मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणे ही सारी कामे `बीआरओ (BRO) टीम`च्या सहकार्याने विनासायास आणि विश्वासार्हतेने होतात. ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्यात देवगिरी बँक आघाडीवर आहे. देवगिरी बँकेच्या तत्पर कार्यपद्धतीमुळे दैनंदिन बँकिंग व्यवहारासाठी आता फारसा वेळ खर्च करण्याची गरज उरलेली नाही. रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या अशा अनेक सुविधा बँक पुरविते. RTGS / NEFT यांसारख्या सुविधांच्या जोडीला देवगिरी बँकेचे मोबाईल ऍपही ग्राहकांना उपयोगी ठरते. बँकेच्या ई-कॉमर्स, ई-स्टेटमेंट, SMS अलर्ट सुविधांमुळे खात्यात होणारा रकमेचा भरणा आणि वजावट यांची माहिती ग्राहकास त्वरित मिळते. घरातील मौल्यवान दागदागिने, महत्वाची कागदपत्रे यांना सुरक्षित ठेवणारी बँकेची लॉकर सुविधाही आहे.

  आता तुम्ही फक्त एक करा, तुमचं घर किंवा फ्लॅट फायनल करा, देवगिरी बँक तुम्हाला देईल अल्प व्याजदरावर गृहकर्ज. उद्योगात मोठी उंची गाठायचीय, तर अर्थसाह्य घ्या देवगिरी बँकेचे. मुला-मुलींना शिक्षणासाठी खुशाल परदेशात पाठवा... आहे, देवगिरी बँक शैक्षणिक कर्जही देते. तुमची सगळी स्वप्ने साकार करण्यासाठी एकच नाव... देवगिरी बँक...! आजच जवळच्या शाखेला भेट देऊन देवगिरी बँक परिवारात सहभागी व्हा...!