Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Turn Your Dream Into Reality With Deogiri Bank
Deogiri Bank Blog Image

देवगिरी बँकेच्या साथीने, गुढीपाडव्याला साकार करा तुमची स्वप्ने...!

30 March 2022

  तुम्ही-आम्ही सारेच जण आशेवर जगत असतो. आज नाही तर उद्या नक्कीच आपण यशस्वी होऊत... आपली स्वप्नेही साकार होतील, या आशेवर आपले प्रयत्न सुरू असतात. गतवर्षी नाही जमले, पण यंदाच्या वर्षी आपण नक्कीच आपल्या स्वतःच्या घरात जाऊ, असा काहींचा विचार असतो, तर कुण्या उद्योजकाच्या मनात व्यवसाय विस्ताराचे बेत सुरू असतात...! तुमची ही सगळी स्वप्ने नक्कीच साकार होतील. तुमचे कठोर प्रयत्नही नक्कीच फळास येतील. तुमच्या सर्व आशा-आकांक्षा, स्वप्ने साकार होवोत, या गुढीपाडवा अर्थात नववर्षानिमित्त शुभेच्छा...! मराठवाड्यात लोकप्रिय असलेल्या देवगिरी बँकेच्या सहकार्याने यंदाच्या वर्षी तुमची स्वप्ने नक्कीच साकार होऊ शकतात. वेगवान कामकाज, विश्वासार्हता आणि पारदर्शकता जपून सेवेसाठी तत्पर असलेला कर्मचारीवर्ग, अल्प व्याजदराच्या कर्ज योजना आणि त्वरित कर्जमंजुरी यामुळे देवगिरी बँकेने मराठवाड्यातील जनमानसात प्रतिष्ठेचे स्थान मिळविले आहे. देवगिरी बँकेने ग्राहकांच्या अडचणी ओळखून कर्ज योजनांसाठी सहजसुलभ परतफेडीचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तत्पर सेवा मिळत असल्याने बँकेच्या ग्राहकसंख्येतही मोठी वाढ होताना दिसते.

  देवगिरी बँकेच्या विविध कर्ज योजनांचा ग्राहकांना मोठा फायदा होतो. देवगिरी बँकेची गृहकर्ज योजना ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. उद्योगविश्वात औद्योगिक संस्थांना कर्ज त्वरित कर्जपुरवठा होत असल्याने त्यांचा विस्ताराचा आणि प्रगतीचा मार्ग देवगिरी बँकेने अधिक सुकर केला आहे. भारतात किंवा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जाते. त्यामुळे पैशांअभावी राहिलेले त्यांचे शिक्षण पूर्ण होऊन पालकांचेही स्वप्न साकार होते. सण-उत्सवांच्या शुभमुहूर्तावर आलिशान कार घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अशांसाठी बँकेने वाहन कर्ज योजना आणली आहे. अतिशय सुलभ परतफेडीचे अनेक पर्याय देवगिरी बँक उपलब्ध करून देते. रोजच्या जीवनात अचानक येणाऱ्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी देवगिरी बँकेची वैयक्तिक कर्ज योजना खऱ्या अर्थाने साह्यभूत ठरते.

  मराठवाड्यातील अग्रणी बँक अशी ओळख असलेली देवगिरी बँक ग्राहक सेवेत आघाडीवर आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना अनेक ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पारदर्शक व्यवहार आणि विश्वसनीयतेच्या बळावर बँक आजघडीला प्रगतिपथावर आहे. २३ जानेवारी १९८४ रोजी स्थापन झालेल्या देवगिरी बँकेच्या एकूण ३१ शाखा आहेत. तसेच कर्मचारी प्रशिक्षण केंद्र, आधुनिक डेटा सेंटर, कॉल सेंटर, कर्ज विभाग आणि मुख्य कार्यालय असा प्रचंड मोठा व्याप देवगिरी बँकेचे अधिकारी-कर्मचारी अत्यंत कुशलतेने सांभाळतात. बँकेने म
राठवाड्यातील जनमानसावर अधिराज्य निर्माण केले आहे.

  देवगिरी बँकेने आजवर समाजाच्या सर्व स्तरांमध्ये पसरलेल्या ग्राहकवर्गाशी एक निराळे अनुबंध जपले आहेत. बँकेची कॉल सेंटर टीम ग्राहकांच्या मागणीचा वेळोवेळी पाठपुरावा घेते. ग्राहकांच्या साह्यासाठी बँकेची `बीआरओ (BRO) टीम` सज्ज असते. कर्ज प्रकरण, खाते उघडणे, मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणे ही सारी कामे `बीआरओ (BRO) टीम`च्या सहकार्याने विनासायास आणि विश्वासार्हतेने होतात. बँकिंग कामकाजात होणारे बदल आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्यात देवगिरी बँक आघाडीवर आहे. देवगिरी बँकेच्या तत्पर कार्यपद्धतीमुळे दैनंदिन बँकिंग व्यवहारासाठी आता फारसा वेळ खर्च करण्याची गरज उरलेली नाही. रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या अशा अनेक सुविधा बँक पुरविते. RTGS / NEFT यांसारख्या सुविधांच्या जोडीला देवगिरी बँकेचे मोबाईल ऍपही ग्राहकांना उपयोगी ठरते. ग्राहकाची कुठलीही गैरसोय न होऊ देता, कामकाजाचा तात्काळ निपटारा हेच ध्येय बाळगून संपूर्ण अधिकारी-कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. बँकेच्या ई-कॉमर्स, ई-स्टेटमेंट, SMS अलर्ट सुविधांमुळे खात्यात होणारा रकमेचा भरणा आणि वजावट यांची माहिती ग्राहकास त्वरित मिळते. घरातील मौल्यवान दागदागिने, महत्वाची कागदपत्रे यांना सुरक्षित ठेवणारी बँकेची लॉकर सुविधाही आहे.

  अशा विविध ग्राहकाभिमुख सेवा आणि कर्ज सुविधा पुरविणाऱ्या देवगिरी बँकेने अनेकांना मोठा आर्थिक आधार दिला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची स्वप्ने साकार करायची असतील तर काळजी कशाला करता, देवगिरी बँक आहे ना...! आजच देवगिरी बँकेच्या जवळच्या शाखेला भेट द्या आणि वेगवान बँकिंग सेवा पुरविणाऱ्या देवगिरी बँक परिवारात अभिमानाने सहभागी व्हा...!
आपणा सर्वांना गुढीपाडवा तथा नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा...