Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Precautions, Bank Locker , Deogiri Bank.
Deogiri Bank Blog Image

बँकेत लॉकर आहे...! मग काय दक्षता घ्याल...?

28 October 2021

सध्याच्या असुरक्षिततेच्या काळात आपली संपत्ती आणि मौल्यवान दागदागिने यांची सुरक्षा करणे हे आपले प्रथम कर्तव्य ठरते. चोरीसारख्या अप्रिय घटना टाळायच्या असतील तर आपल्याकडील चीजवस्तू, दागदागिने, महत्त्वाची कागदपत्रे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणे हितावह असते. सुरक्षेचा हा प्रमुख मार्ग आहे. आता बँकांमधील लॉकर सुविधेविषयी जाणून घेऊयात...!

  • सर्वच प्रमुख बँका आपल्या ग्राहकांना लॉकर सुविधा पुरवितात. बँकिंग व्यवहारात जसे बँक व कस्टमर असे नाते असते, तसेच लॉकर सुविधा भाड्याने (लीज) घेतली जात असल्याने हे नाते ‘लेजर’ व ‘लेजी’ अशा प्रकारचे होते.
  • बँकांकडे उपलब्ध असलेल्या लॉकरची संख्या व मागणी यात बरेचदा तफावत निर्माण होते. त्यामुळे लॉकर देताना बँका ग्राहकांकडून लॉकर डिपॉझिट घेऊ शकतात.
  • लॉकरच्या आत लॉकरधारकाने काय ठेवले आहे? हे पाहण्याचा अधिकार बँकांना नसतो.
  • जसे तुम्ही बँकेच्या बचत खात्यात किंवा मुदत ठेव खात्यात विश्‍वासाने पैसे ठेवता, त्याच विश्‍वासाने तुम्ही लॉकरमध्ये दागदागिने, मौल्यवान वस्तू, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे इत्यादी ठेवू शकता.
  • बँकेने ग्राहकाला दिलेल्या लॉकरच्या चाव्यांचे दोन ‘सेट’ असतात. एक ‘सेट’ लॉकरधारकाकडे असतो, दुसरा ‘सेट’ बँकेकडे असतो.
  • लॉकर उघडताना दोन्ही ‘सेट’च्या चाव्या लावल्याशिवाय ते उघडता येत नाही; पण बंद करताना मात्र केवळ लॉकरधारकाच्या एका चावीने ते बंद करता येते.
  • लॉकर शक्यतो संयुक्त नावावर घ्यावे, तसेच त्यासाठीचे ‘नॉमिनेशन’ही तात्काळ करून घ्यावे.
  • ‘नॉमिनेशन’ केल्यास लॉकरधारकाचा मृत्यू झाल्यावर लॉकरमधील वस्तूंचा वारसास विनासायास ताबा मिळू शकतो.
  • लॉकरधारकाने लॉकर सुविधा घेताना त्यासंबंधी नियम-अटी आणि इतर बाबी काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात.
  • लॉकर वेगवेगळ्या आकाराचे असतात, त्याप्रमाणे भाडे शुल्कही वेगवेगळे असते.
  • वर्षात किती वेळा लॉकर उघडण्यास परवानगी आहे, हेही आधीच ठरलेले असते.
  • ग्राहकाने स्वत:च्या हितासाठी अधूनमधून लॉकर उघडून आतल्या वस्तू तपासाव्यात.
  • बँकेमधील लॉकर चांगल्या धातूने बनविलेले व सर्व गोष्टींची काळजी घेऊन निर्माण केलेले असतात.