Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Bank Loan on Gudi Padwa
Deogiri Bank Blog Image

कर्ज घेताय? पण 'ही' गोष्ट तपासल्याशिवाय तुम्हाला कोणीही कर्ज देणार नाही

12 April 2021

आर्थिक अडचणीत तुम्ही बँकेत कर्ज मिळविण्यासाठी गेले असता बँकेने तुम्हाला पहिला प्रश्न तुमचा सिबिल स्कोअर किती आहे, हा विचारला असेल?

तर काय आहे हा सिबिल स्कोअर? तो कमी हवा की जास्त? तो कसा बघायचा? आणि तो कसा वाढवायचा हे जाणून घेऊया आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून...
सर्वसामान्य किंवा उच्चभ्रू कोणत्याही व्यक्तीला जेव्हा कर्जाची गरज भासते तेव्हा प्रत्येक बँक किंवा वित्तीय संस्था सर्वात पहिल्यांदा त्याचा सिबिल स्कोअर तपासते. महत्वाच्या सर्व कर्जवाटप संस्था / सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकासुद्धा सिबिल स्कोअर तपासल्याशिवाय अजिबात कर्ज मंजूर करत नाहीत.

सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० च्या दरम्यान गणला जातो. ३०० हा सर्वात कमी, तर ९०० हा सर्वात चांगला सिबिल स्कोअर असल्याचे दर्शवतो. सिबिल स्कोअर चांगला असणे याचा अर्थ असा होतो की, तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे आणि तुम्ही कर्जाची परतफेड किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट योग्य वेळेत करत आहात.
सिबिल (Cibil) म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो (इंडिया) लिमिटेड. आजच्या ट्रान्स युनियन सिबिल लिमिडेटद्वारे सिबिल स्कोअर तयार केला जातो. ती कंपनी / व्यक्ती व व्यावसायिक संस्थांचे पत रेकॉर्ड संकलित करते व देखरेख करते. यात कर्ज आणि क्रेडिट कार्डशी संबंधित इत्यंभूत माहिती समाविष्ट आहे.

तुम्हाला गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड घ्यायचे असल्यास बँकांकडून सिबिल स्कोअर तपासला जातो. त्यामुळे सिबिल स्कोअर चांगला असणे हे खूपच महत्वाचे ठरते. जर आपला सिबिल स्कोअर ७५० पेक्षा कमी असेल तर आपल्याला बँका किंवा एनबीएफसी यांच्याकडून कर्ज घेण्यास अडचणी येतात.

सिबिल स्कोअरमध्ये चार महत्वाचे घटक तपासतात:

कर्ज परतफेडीचा नियमितपणा
आजवर दिली गेलेली कर्जे
कर्ज प्रकार / रक्कम आणि कालावधी
इतर घटक

सिबिल स्कोअर प्राप्त करण्यासाठी आपले नाव, पॅन क्रमांक / मोबाईल नंबर / आधार क्रमांक पुरेसा असतो.

उच्च सिबिल स्कोअरचे फायदे -
कर्जावरील स्वस्त व्याजदर
पूर्व-मंजूर कर्ज पात्रता
दीर्घ मुदतीची कर्जे
वेगवान कर्ज प्रक्रिया
कर्ज प्रक्रिया शुल्क आणि इतर शुल्कावर सवलत
उच्च क्रेडिट कार्ड / कर्ज मर्यादा


सिबिल स्कोअर कसा जपावा...?

कर्ज परतफेड करता येईल तितकेच घ्या
ईएमआय तारीख कधीही चुकवू नका
क्रेडिट कार्डचे देयक दिवसाच्या किमान १ दिवस आधी भरा.
वेगवेगळ्या ठिकाणी कर्जासाठी अर्ज करू नका.
कर्ज काढताना स्वतःची योग्य आणि खरी माहिती दया.
कर्ज / क्रेडिट कार्डची थकबाकी देताना कधीच तडजोड रक्कम भरू नका.

आपल्या सिबिल स्कोअरचे नियमित परीक्षण करा. सिबिल स्कोअर हा नेहमी चांगला ठेवा.