सिबिल स्कोअर 'इतका' असल्याशिवाय कोणतीच बँक देणार नाही कर्ज !
कर्ज घेण्यासाठी तुम्ही एखाद्या वित्तसंस्थेत अथवा बँकेत गेलात की, तुम्हाला पहिला प्रश्न विचारल्या जातो, तो म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर किती आहे ? बँकिंग किंवा वित्तसंस्थांमध्ये सिबिल स्कोअरला खूपच महत्व आहे. सिबिल स्कोअरच्या आधारावरच तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देण्यात येतं.
गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड घ्यायचे असल्यास, वित्तसंस्था तसेच बँकांकडून सिबिल स्कोअर तपासला जातो. त्यामुळे सिबिल स्कोअर चांगला असणे, हे खूपच आवश्यक ठरते. सिबिल स्कोअर हा क्रेडिट हिस्ट्रीचा एक अंकात्मक सारांश आहे, जो तुमच्या मागील पेमेंट्सच्या ट्रॅक रेकॉर्ड दर्शवतो. सिबिल स्कोअर हा ट्रान्स युनियन सिबिल लिमिडेट द्वारे तयार केला जातो.
सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० च्या दरम्यान गणला जातो. ३०० हा सर्वात वाईट, तर ९०० हा सर्वात चांगला सिबिल स्कोअर असल्याचं दर्शवतो. सिबिल स्कोअर चांगला असणे याचा अर्थ असा होतो की, तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे आणि तुम्ही कर्जाची परतफेड किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट योग्य वेळेत करत आहात.
७५० इतका सिबिल स्कोअर हा चांगला असल्याचं मानलं जातं आणि वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी पात्र ठरवण्यास आपली मदत करतो. जर आपला सिबिल स्कोअर ७५० पेक्षा कमी असेल, तर आपल्याला कर्ज घेण्यास अडचणी येतात.
सिबिल स्कोअर मेंटेन ठेवण्यासाठी 'या' गोष्टी अवश्य करा !
▪ सिबिल स्कोअरचे नियमित परीक्षण करा -
तु,म्ही तुमच्या सिबिल स्कोअरचे परीक्षण करू इच्छित असल्यास, तुम्ही तो तपासून घेऊ शकता.
ट्रान्स युनियन सिबिल लिमिडेट यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा सिबिल नियमित तपासून शकाल.
▪ क्रेडिट स्कोअरची पडताळणी करा -
क्रेडिट अहवाल त्रुटीमुक्त ठेवण्यासाठी नियमित सिबिल स्कोअरचे परीक्षण करायला पाहिजे. जर आपल्याला रिपोर्टमध्ये काही चूक आढळली, तर त्याची पडताळणी करून वेळेत दुरुस्त करावे.
▪मर्यादित वापर-
क्रेडिटवर मर्यादेहून अधिक खर्च टाळावा आणि नियमित खात्री करुन घ्यावी. जर तुम्हाला सिबिल स्कोअर ७५० पर्यंत ठेवायचा असेल तर आपल्या क्रेडिट कार्ड मर्यादेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्तीचा खर्च करू नका.
▪ देयकांची परतफेड वेळेत करा -
हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. जर तुम्ही एखादं कर्ज घेतलं असेल किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला असेल, तर त्याचे हफ्ते नियमित व वेळेवर भरा. वेळेवर हफ्ता भरल्यास तुमचा सिबिल स्कोअर सुधारण्यास मदत होते.
अधिक माहितीसाठी आजच 'छत्रपती मल्टीस्टेट'च्या जवळील शाखेत भेट द्या !
कॉल - १८०० २१२ ५५५ ४४४