Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Disable Right-Click and Shortcuts
Screenshot detected! Content hidden.
Read before buying loan
Deogiri Bank Blog Image

कर्ज घ्यावे की नाही, संभ्रमात आहात ? मग हे नक्की वाचा !

21 September 2022

'कर्ज' हा शब्द जेव्हा आपण पाहतो किंवा वाचतो, तेव्हा अनेक प्रश्न आणि शंका- कुशंका मनात येतात. सर्वात प्रथम आपण विचार करतो, कर्ज घेणे योग्य आहे का ? ते कर्ज फेडणे मला जमेल का? कर्ज मिळण्यासाठी मी पात्र आहे का? या बरोबरच कर्ज कोणत्या बँकेकडून घ्यावे? कर्ज मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा? असे असंख्य प्रश्न मनात येतात.

कर्ज घेणे म्हणजे चूकीचं वगैरे आहे, हा गैरसमज पहिल्यांदा मनातून काढून टाका. तुमच्या आर्थिक गरजेच्या वेळी तुम्हाला पैसा उपलब्ध होतो आहे, ही बाब लक्षात घ्या. हा एक व्यवहार आहे, जसे आपण सामाजिक जीवनात दैनंदिन गरजेच्या वेळी काही गोष्टींची देवाण-घेवाण करतो अगदी तसेच. त्यामुळे भीती किंवा कमीपणा वाटण्याचे काही कारणच नाही.

आपली अनेक स्वप्न असतात उदा; घर खरेदी, गाडी खरेदी, पाल्यांचे उच्च शिक्षण, व्यवसाय-उद्योग सुरू करणे तसेच याशिवाय अचानक उद्भवलेलं आजारपण व इतर आर्थिक संकटही उभे राहू शकतात. परंतु आपण यासाठी एकरकमी पैसा उपलब्ध करू शकत नाही. अशावेळी नातेवाईक, मित्र मंडळीकडूनही आपल्याला अपेक्षित रक्कम उपलब्ध होत नाही. या परिस्थितीत वित्तसंस्था हा एक उत्तम पर्याय ठरतो. वेळेवर तत्काळ पैसा उपलब्ध होतो. सुलभ हप्त्याने परतफेडीचे विविध पर्याय मिळतात. आपल्याला कालावधी निवडण्याची सोय असते.

आज जरी तुम्हाला कर्जाची आवश्यकता नसेल, तरी भविष्यात तुम्हाला कदाचित गरज भासू शकते. अशा वेळेस वित्तसंस्थांकडून तुमच्या आर्थिक व्यवहारांची पत तपासल्या जाते. किमान यासाठी तरी तुम्हाला आजस्थितीत छोटं-मोठं कर्ज घेऊन, त्याची नियमित परतफेडीद्वारे तुमची आर्थिक व्यवहारांची पत वाढवावी लागेल.

सर्वसामान्यपणे आपल्याकडे दोन कारणांसाठी सर्वाधिक कर्ज घेतात, एक म्हणजे गृहकर्ज किंवा व्यावसायिक कर्ज. देवगिरी बँकेमध्ये यासोबतच तुमच्यासाठी इतर कारणांसाठी देखील कर्ज सुविधा उपलब्ध आहे.

कर्ज योजनांच्या अधिक माहितीसाठी आजच देवगिरी बँकेच्या जवळील शाखेला भेट द्या !
लगेच 9022 100 400 नंबरवर कॉल करा !

Uno Dos Tres Cuatro Seis
Call Call Now