Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

A Precious Rakshabandhan Gift| Deogiri Bank
Deogiri Bank Blog Image

रक्षाबंधन सणाला बहिणीला काय गिफ्ट द्यावं हा विचार करताय ? या रक्षाबंधन सणाला आपल्या बहिणीला द्या ही अनमोल भेट !

06 August 2022

एक भाऊ आपल्या बहिणीला देऊ शकेल अशी सर्वोत्तम भेट म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य आणि तिच्या आर्थिक स्वातंत्र्याला सुरूवात करण्यासाठी किंवा त्यात आणखी भर घालण्यासाठी रक्षाबंधन सणापेक्षा उत्तम दिवस कोणता असू शकतो ?
या रक्षाबंधन सणाला तुम्ही तुमच्या बहिणीला भेटवस्तू देण्याचा विचार करीत असाल, तर तुम्ही तिचं भविष्य आर्थिक दृष्टीनं सक्षम करणारी पुढील एक भेटवस्तू निवडू शकता !

१. बचत खाते -
तुम्ही तुमच्या बहिणीसाठी बँकेत बचत खातं उघडू शकता. या बचत खात्यात तुम्ही तिला देऊ इच्छित असलेले पैसे जमा करू शकता. या खात्यात जमा केलेल्या पैसे सुरक्षित राहील आणि उत्तम व्याजही मिळेल. ती जेव्हा गरज असेल, तेव्हा हे पैसे वापरू शकेल.

२. मुदत ठेव (FD) -
तुम्ही तुमच्या बहिणीच्या नावावर मुदत ठेव(FD) करू शकता. यामुळे तिच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी एक निश्चित रक्कम सुरक्षित राहील आणि दर महिन्याला यावर आकर्षक व्याजदरही मिळेल.

३. आवर्ती ठेव (RD) -
जर तुम्हाला दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवायची असेल, तर तुम्ही तुमच्या बहिणीसाठी बँकेत आवर्ती ठेव (RD) करू शकता. या माध्यमातून तुम्ही दरमाह विशिष्ट रक्कम आवर्ती ठेव खात्यात जमा करू शकता. या रकमेवर आकर्षक व्याज सुद्धा मिळते.

४. SIP सुरू करा-
म्युच्युअल फंडातील पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) ही तुमच्या बहिणीसाठी एक उत्तम भेट ठरू शकते. तुम्ही तुमच्या बहिणीसाठी तुम्हाला हवी तितकी वर्षे नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवू शकता. तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार तुम्ही SIP द्वारे इक्विटी किंवा डेट फंडामधील गुंतवणूक निवडू शकता. तुम्हाला म्युच्युअल फंडाविषयी मर्यादित किंवा काहीच माहिती नसल्यास तुम्ही आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.
देवगिरी नागरी सहकारी बँक लि., औरंगाबाद ही महाराष्ट्रातील अग्रणी बँक आहे. बचत खातं, मुदत ठेव तसेच आवर्ती ठेवीवर देवगिरी बँक उत्तम रिटर्न्स देत आहे. याशिवाय ग्राहकांना अत्याधुनिक बँकिंग सेवा, आकर्षक कर्ज योजना उपलब्ध करून देत आहे. आपणही एकवेळ भेट देऊन सुरक्षित, सुलभ व विश्वसनीय बँकिंग सेवेचा लाभ घ्या !